आज (शनिवार, 21 मे) आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्ष प्रीती शर्मा मेनन यांनी पत्रकार परिषद घेतली. विले पार्लेच्या वाल्मिकी नगर येथून मेट्रो लाईन जाणार असून त्यासाठी वाल्मिकी नगरमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीतील लोकांना MMRDA ने नोटीस पाठवत घर खाली करण्यास सांगितले. याच्या विरोधार्थ प्रीती शर्मा मेनन व अनेक आपचे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. तर या पत्रकार परिषदेनंतर त्यांनी HW मराठीशी बातचीत केली. यावेळी त्यांनी विविध विषयावर चर्चा केली.